पूर्णपणे विवस्त्र होऊन झोपण्याचे आरोग्यदायी फायदे!

40 Shares

पूर्णपणे विवस्त्र होऊन झोपण्यात अनेकांना चांगलं वाटत नसेल. पण असे विवस्त्र झोपणे नाकारण्याआधी त्याचे अनेक फायदेही आहेत हे जाणून घ्या. विवस्त्र झोपण्याचे अनेक आरोग्यदायी आणि मानसिक फायदेही आहेत.  हे वाचायला जरा विचित्र वाटत असलं तरी हे सत्य आहे. चला जाणून घेऊया पूर्णपणे विवस्त्र होऊन झोपण्याचे फायदे…

1) तुम्हाला शांत करते    

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात उष्णता असल्याने शांत झोप लागणे तसे कठीणच. अशावेळी कपड्यांमुळे अधिकच गरम होतं. विवस्त्र झोपल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत होते. परिणामी एसीच्या अचानक थंड होणार्‍या वातावरणापासून दूर राहून शांत आणि पटकन झोप येण्यास मदत होते.

2) स्वतःच्या शरीराकडे सकारात्मकतेने पहाल

स्वतःला नग्न पाहणे आणि शरीराच्या आकाराला स्विकारणे ही अनेकांसाठी कठीण बाब आहे. काही मॉडेल्स आणि सिनेतारकांची ‘परफेक्ट बॉडी’ आंधळेपणाने आदर्श मानून अनेकांना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. विवस्त्र झोपल्याने स्वतःबद्दलचे असे काही गैरसमज दूर करून स्वतःला स्विकारणे अधिक सुकर होते. तसेच हळूहळू स्वतःच्या शरीरामध्ये होणारे बदल तुम्हांला जाणवल्याने तुमचा दृष्टीकोन बदलायला मदत होईल.

3) त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते

दिवसभर कपड्यांमध्ये राहिल्याने उष्णतेमुळे त्वचेला रिलॅक्स होण्यासाठी पुरेशी संधी मिळत नाही. मात्र रात्री झोपल्यानंतर त्वचेमध्ये काही बदल होतात. अशावेळी विवस्त्र होऊन झोपल्यास त्वचेच्या कार्यामध्ये कपड्याचा अडथळा येत नाही. त्वचा स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकते. तसेच स्कीनवर सुरकुत्या येणेही कमी होते.

4) शुक्राणूंची निर्मिती सुधारते 


युनिव्हर्सिटी ऑफ सॅन्डफॉर्ड आणि नॅशनल हेल्थ इन्स्टिट्युट ऑफ़ चाईल्ड अ‍ॅन्ड ह्युमन डेव्हलप्मेंट 2015 यांच्या अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी टाईट बॉक्सर किंवा अंडरवेअर घातल्याने शुक्राणूंच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 500 पुरूषांवर केलेल्या अभ्यासातील निष्कर्षानुसार, घट्ट अंडरवेअर घालणार्‍यांच्या तुलनेत रात्री नग्न झोपणार्‍या पुरूषांच्या शुक्राणूंमध्ये डीएनए फ्रॅगमेंटेशनचा धोका 25 % कमी आढळून आला. हा अहवाल संशोधकांनी अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टीव्ह मेडिसिनच्या वार्षिक सभेमध्ये मांडला.

5) योनिमार्गाचे आरोग्य सुधारते 

त्वचेप्रमाणे योनिमार्ग देखील आरोग्यदायी राहण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. व्हर्जिनल यिस्ट इंन्फेक्शन हे दमट जागी अधिक होते. त्यामुळे नग्न झोपल्यास स्त्री शरीरातील नाजूक भागात फंगल्सची वाढ होत नाही. परिणामी खाज येणे, इंफेक्शनचा धोका कमी असतो.

6) थकवा दूर होतो

तज्ज्ञांनुसार नाईट सूटच्या तुलनेत काहीही परिधान न करता झोपण्याचा आनंद इतर कोणतीही वस्तू देऊ शकत नाही. यामुळे चुटकीसरशी व्यक्तीचा थकवा दूर होऊन त्याला आरामदायक झोप लागते.

(टिप : हे सर्व फायदे असेच प्राप्त होणार नाहीत. यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.)

40 Shares

Related Post:Leave a Reply