नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. कंगालातील कंगाल व्यक्ती सुद्धा श्रीमंत बनते. जर त्यांच्या घरी असतील या पाच वस्तू… मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अश्या पाच वस्तूंबद्धल ज्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ समजल्या जातात. या वस्तू माता लक्ष्मीला घराकडे खेचून आणतात. श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. तुमच्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हवा की मी जो उपाय करतोय तो उपाय अगदी योग्य आहे. आणि या उपायाचा परीणाम शुभदायीच होणार आहे.
मित्रांनो आशेवरच जग टिकलेले आहे. जर तुमच्या मनामध्ये आशा नसून निराशा असेल तर तुम्ही कोणताही उपाय करा त्याचे परीणाम मिळत नाहीत. म्हणून श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्ट आपल्या मनामध्ये पूर्णपणे असायला हवा. चला तर आज आपण पाहूया अश्या कोणत्या पाच वस्तू आहेत की ज्या वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ समजल्या जातात. या पाच वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये कधीही गरिबी टिकणार नाही. आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहील. धन धान्य आणि पैशाने घर भरलेले राहील.
1) श्री गणेश ची मूर्ती
श्री गणेश देवांचे देव आहेत. प्रथमेश म्हणून ओळखल जात. देवांमध्ये अग्रस्थान दिल जात. तर अशी श्री गणेश ची मूर्ती आपल्या घरामध्ये नक्की स्थापित करा आणि ही मूर्ती स्थापित करताना ह्या मूर्तीच लक्ष आपक्या प्रवेशद्वारा वर असेल याची काळजी घ्या. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे. या मुख्य दरवाजावरती श्री गणेश च लक्ष असायला हवं अश्या प्रकारे मूर्ती स्थापित करा.
सकाळी उठल्यानंतर पहिल्या प्रथम श्री गणेशाचे दर्शन घ्या. अगदी मनोभावे त्यांचं दर्शन घ्या. तुमची जीवनात कोणतेही दुःख, कोणताही प्रश्न राहणार नाही. श्री गणेशांना विग्नहर्ता अस म्हंटल जात. म्हणजे ते आपली सर्व दुःख हरण करतात. सर्व दुःख नष्ट करतात. तसेच ते सुखकर्ता आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये सुखाचा वर्षाव करण्याची ताकद श्री गणेश मध्ये आहे. तसेच माता लक्ष्मीला खेचून आणण्याची ताकद सुद्धा गणेश ठेवतात. आणि म्हणून श्री गणेशाची मूर्ती आपल्या घरामध्ये नक्की असावी. ज्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद होतात सतत भांडणे होतात सुख शांती नाही अश्या लोकांनी नृत्य करणारी श्री गणेशाची मूर्ती स्थापित करावी.
2) बासरी
होय बासरी तीच बासरी जी श्री कृष्णाने वाजवली होती. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी ही एक अत्यंत शुभ वस्तू आहे. श्री कृष्णाची बासरी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो त्या वेळी माता लक्ष्मीचा आशिर्वाद आपोआपच त्यांना मिळत जातो. श्री कृष्ण हे विष्णुचे अवतार आहेत. आणि म्हणून त्याच प्रिय वाद्य बासरी असत त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा वास करणे पसंत करते. वास्तुशास्त्र अस मानत की चांदीची बासरी माता लक्ष्मी ला सर्वात आकर्षित करते.
3) दक्षिणावरती शंक
दक्षिणावरती शंक ही माता लक्ष्मी च्या हातामधील एक वस्तू आहे. आणि म्हणून अशी माता लक्ष्मीस प्रिय असणारी वस्तू सुद्धा आपण आपल्या घरामध्ये किंव्हा देवघरामध्ये नक्की स्थापित करायला हवी. असा हा दक्षिणावरती शंक ऐका लाल रंगाच्या कापड्यामध्ये गुंडाळून तो देवघरामध्ये ठेवावा आणि त्या नंतर दररोज नित्य नियमाने या शंकाची पूजा करावी. ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो त्याच प्रकारे आपण शंकाची पूजा करावी. त्या मुळे सुद्धा माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या घरावरती कायम राहतो.
4) लक्ष्मी कुबेर प्रतिमा
तुम्ही सर्व जण माता लक्ष्मी ची पूजा करत असला मात्र माता लक्ष्मी बरोबरच आपण कुबेरांची सुद्धा पूजा करायला हवी. कुबेरांना देवतांचा जो खजिना आहे त्या खजिन्याचा रक्षक अस मानतात. किंव्हा हा सर्व खजिना कुबेराकडे ठेवलेला असतो. आणि म्हणून श्री कुबेरांची पूजा केल्याने आपल्याला दुहेरी फायदा मिळतो. लक्ष्मी कुबेरांची मूर्ती ही उत्तरेकडील भिंतीवरती लावावी. कारण श्री कुबेर उत्तर दिशेचे धनी आहेत. उत्तर दिशेचे मालक आहेत. तर या उत्तर दिशेच्या भिंतीवरती ही प्रतिमा लावल्यास ज्यास्त फायदा होतो.
5) कापूर
आपण दररोज देवपूजा झाल्यानंतर घराच्या मधोमध किंव्हा घराच्या मध्यभागी कापूर जाळावा. ज्या घरामध्ये कापूर नित्य नियमाने जाळला जातो कापूर प्रज्वलित केला जातो त्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. आणि अश्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा वास करते. कापराच देवपूजेमधील आणि वास्तुशास्त्रामधल अनन्य साधारण आहे.
कापूर ही माता लक्ष्मीशी जोडलेली गोष्ट आहे. आणि म्हणून आपण दररोज सकाळी संध्याकाळी शक्य असेल तर कापूर नियमित पणे जळावा. तर मित्रांनो अश्या या पाच वस्तू आपण घरामध्ये नक्की ठेवा. कंगालातील कंगाल व्यक्ती सुद्धा या मुळे श्रीमंत बनतो. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा…
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.